*परवा सहज कपाट आवरताना एक खुप जुनं पुस्तक सापडलं माझ्या लहानपणीचं गोष्टींचं पुस्तक. त्यात एक गोष्ट मला खुप आवडायची. गोष्टीचं नाव होतं 'बरणीतले काजू' ! काजु ह्या खाऊचं मला लहानपणी फार आकर्षण त्यामुळे ही गोष्ट मी वारंवार वाचायचो. आज पुन्हा ती गोष्ट वाचताना मजा येत होती पण सोबतच ती जुनी गोष्ट आज नव्याने उलगडत होती.*
*त्या गोष्टीतल्या लहान मुलाला काजु फार आवडत असल्याने एकदा काजुच्या बरणीत हात घालुन त्याने मुठ भरली. पण बरणीचं तोंड निमुळतं असल्याने हात काही बाहेर निघेना. त्याने बराच प्रयत्न केला पण तरीही निघेना, त्याची ही धडपड बघणारी आजी त्याला सांगु लागली, बाळा ती मुठ भरली आहेस ना ती सोड, काजु बरणीत टाकुन दे, मग आपोआप हात बाहेर निघेल. त्या लहान मुलाचाआजीवर खूप विश्वास आणि आपली आजी जे सांगेल ते बरोबर ह्या भोळ्या मनाने त्याने ते ऐकले आणि हातातली काजु सोडुन दिलेआणि खरंच आजीने सांगितल्या प्रमाणे त्याचा अडकलेला हात बाहेर निघाला आणि त्याचा चेहरा आनंदाने खुलला !*
*ही गोष्ट मला बरंच काही सुचवून गेली ! किती गोष्टी धरून ठेवल्यात आपण, दुःख, राग, लोभ,क्रोध, मत्सर जुन्या कडु आठवणी पण आपण धरुन बसलेलो आहोतआणि त्या मुलासारखंच स्वतःला अडकवुन बसलोय ! तेव्हा लक्षात आलं की अरे जीवनात दुःख असं नाहीच आहे. आपण धरुन ठेवलंय सगळं ! हे तर लक्षातच घेतलं नाही कधी की फक्त सोडायचा अवकाश ! आहे तो सगळा आनंदच आनंद !*
Please translate....